शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:46 IST

उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला

ठळक मुद्देजयसिंगपूर येथील विराट ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग; धुराडी पेटू न देण्याचा इशारासंसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार

विश्वास पाटील-राजाराम लोंढे-संदीप बावचे जयसिंगपूर : उसाला पहिली उचल टनास एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यास शेतकºयांनी हात वर करून व मुठी आवळून प्रतिसाद दिला. पहिल्या उचलीबाबत आम्ही लवचिक आहे; परंतु सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत ऊसतोड नाकारा, असे शेट्टी यांनी शेतकºयांना बजावले.

या परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली. या परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपºयांतून शेतकरी प्रचंड संख्येने आले होते. खोत यांनी ऊसदर म्हणजे मटक्याचा आकडा नव्हे, अशी टीका केली होती, त्यास उत्तर द्यायला लोक त्वेषाने आले. त्यामुळे गर्दीचा उच्चांक झाला. विक्रमसिंह मैदानावर झालेल्या या सोळाव्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अजितबाबा शिंदे-नेसरीकर होते.

ऊसदराचा महाराष्ट्राला लागू होणारा निर्णय याच परिषदेत होणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, ‘मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ऊसदराचे काय ठरवायचे, अशी विचारणा करीत आहेत. हा प्रश्न तुम्हाला संपला असल्याचे वाटत असेल, तर मग गेल्यावर्षी ऊसदराचा प्रश्न मी सोडविला असे श्रेय घ्यायला कशाला आला होता..? यंदा देशात जो साखरसाठा शिल्लक आहे, तो या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर आयात न केल्यास तुमच्या उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळेल. थोडा धीर धरा. देशाची गरज २४० लाख टनांची आहे व तेवढेच उत्पादन होणार असल्याने चांगला दर मिळेल, परंतु त्यासाठी १५ दिवस कारखाने बंद पाडायची तयारी ठेवा.

यावेळची लढाई दुहेरी असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, ‘ऊसदरासाठीचा संघर्ष आहेच, परंतु त्याशिवाय देशातील शेतकºयांचा सात-बारा कोरा करण्यासाठीही संघर्ष करायचा आहे. जोपर्यंत खासगी सावकारांसह शेतकºयांच्या डोक्यावरील संपूर्ण कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत ही लढाई आता थांबणार नाही. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठीच आम्ही देशभरातील शेतकºयांना घेऊन दिल्लीवर धडक देणार आहे. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार असून, त्यातील एक सत्र आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या विधवा घेणार आहेत. त्यातील ठराव आम्ही राष्ट्रपतींना भेटून देणार आहे. ही खरी कष्टकºयांची संसद असल्याचे आम्ही देशाला दाखवून देऊ.’‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’च्या खर्चासाठी शेतकºयांचा प्रतिसादसात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी २० नोव्हेंबरला दिल्लीत धडक देण्यासाठी महाराष्ट्रातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ म्हणून एक स्पेशल रेल्वेच नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.राज्यातील आत्महत्या केलेल्या ५४३ शेतकºयांच्या विधवांना सन्मानाने किसान संसदेला नेण्यात येणार आहे. रेल्वेच्या खर्चासाठी संघटनेच्यावतीने मदतीच्या आवाहनास शेतकºयांनी भरभरून प्रतिसाद दिला.आमच्यामुळेच ४२ खासदारखासदार शेट्टी म्हणाले, ‘भाजपवाल्यांना मते द्या, असे सांगत मी महाराष्ट्राच्या गावागावांत गेलो म्हणून कधी नव्हे ते ४८ पैकी ४२ खासदार भाजपचे निवडून आले; परंतु निवडून आलेले भामटे निघाले. भाजपवाले मला म्हणतात की मोदींवर टीका करू नका, आम्हाला यातना होतात. परंतु तुम्ही शेतकºयांच्या जीवनात अच्छे दिन आणतो असे सांगून आमचा विश्वासघात केला, त्याच्या यातना आम्हाला होत नाहीत का, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.‘लोकमत’ चे अभिनंदनऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने शनिवारच्या अंकात ऊस दराचे अर्थकारण मांडणारे लेखन प्रसिद्ध केल्याबद्दल परिषदेत ‘लोकमत’चे अभिनंदन केले. उपस्थित शेतकºयांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणStrikeसंप